बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड :डस्टबीन खरेदीचा घाट म्हणजे करदात्या नागरीकांच्या पैशाची उधळपट्टीच – नाना काटे

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी शहरात डस्टबीन खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला होता आणि त्याला स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तब्बल ३० कोटी रुपयांची डस्टबीन ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी वापरण्याची गरज काय? असा सवाल करत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधीपक्षनेते नाना काटे डस्टबीन खरेदीला विरोध दर्शविला आहे.

काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीने १४ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये शहरातील नागरीकांना ओला,सुका व घातक कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घरासाठी तीन डस्ट बिन्स वाटण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरचा उपक्रम स्वच्छ भारत अभियाना अंतर्गंत घेण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत हि खरेदी करण्यात येणार आहे.

      वस्तुत: या आधाही सन२०१५-१६ मध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी घरटी दोन निकृष्ट दर्जाचे डस्टबिन्स वाटप करण्यात आले होते. महिनाभरातच हे डस्टबिन्स एकतर खराब झाले किंवा नागरीकांना त्यांचा वापर कुंडीसारखा केला. त्यामुळे हा प्रयोग सपशेल फसलेला आहे. तसेच या पूर्वी आमदार निधीच्या राखीव वर्गाच्या निधीमधून डस्टबिन्स खरेदी झालेली आहे. परंतु त्याचे अद्याप वाटप झालेले नाही. ते मनपाच्या गोडावूनमध्ये पडून आहेत. शहरातील नागरीकांसाठी डस्टबिन्स पुरविणे हे काम मूळातच पालिकेचे नाही. तसेच शहरातील मध्यमवर्गींयापासून ते उच्चवर्गींयापर्यंतचे नागरीक हे डस्टबिन्स घेणार सुध्दा नाहीत. त्यामुळे या डस्टबिन्ससाठी ३० कोटी रुपयांचा चुराडा का करण्यात येत आहे? यात कोणाचे हित जोपासले जात आहे ?  हि सरळ सरळ करदात्या नागरीकांच्या पैशाची उधळपट्टीच आहे. तसेच आता सध्या सुध्दा ओला,सुका व घातक कचरा ठेकेदार एकत्र करुनच नेत आहेत. मनपाकडे कचरा वर्गिकरणाची सक्षम यंत्रणा अद्यापही नाही. त्यामुळे हा योजनेचा मूळ उद्देशच साध्य होत नाही. त्यामुळे हि योजना राबविणे म्हणजे शहरातील नागरीकांच्या पैशाची नासाडी होणार आहे.

Share this: