क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संतापजनक :भोसरीतील गरोदर महिलेची आत्महत्या ;कारण ऐकून बसेल धक्का

भोसरी (वास्तव संघर्ष) :तुला जेवण बनवता येत नाही , भांडी धुता येत नाही , तुला तुझ्या आई बापांनी काही शिकवले का नाही’ या शुल्लक कारणावरून गरोदर विवाहितेला सतत शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. हा ञास कमी काय तर आरोपींनी गरोदर विवाहीतेच्या पोटात लाथा घातल्या. हे सहन न झाल्याने त्या गरोदर महीलेने आत्महत्या केली, हा संतापजनक प्रकार भोसरीतील भगवतवस्ती येथे शुक्रवारी घडला असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पतीसह सासूसासरे यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात करण्यात आला.

याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती – विशाल विठ्ठल घंदुरे (वय ३५ वर्षे) सासु – शोभा विठ्ठल घंदुरे( वय ५५ वर्षे ) सासरे- विठ्ठल घंदुरे( वय ६५ ) स्नेहल विठ्ठल घंदुरे( वय २ ९ वर्षे) दिर – विजय विठ्ठल घंदुरे( वय ३१ वर्षे ) सर्व रा . समाधान कॉलनी भगवतवस्ती भोसरी) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 21 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत फिर्यादी यांची मयत मुलगी वय ३२ वर्षे रा.समाधान कॉलनी भगतवस्ती भोसरी पुणे हीचे लग्न झाल्या नंतर लगेचच दुस – या दिवसा पासुन तिचे राहते घरी तिला आरोपी पती विशाल विठ्ठल घंदुरे, सासू सासरे नणंद दीर यांनी मिळुन ‘तुला जेवण बनवता येत नाही , भांडी धुता येत नाही , तुला तुझ्या आई बापांनी काही शिकवले आहे की नाही , जा जावुन जिव दे’ असे म्हणुन वांरवार शिवीगाळ करून शारीरिक आणि मानसिक छळ केला .

तसेच फिर्यादी यांची मयत मुलगी ही गरोदर असतांना सासुने व नंणदेने रागाने फिर्यादीच्या मुलीस हातास धरून जमिनीवर ढकलुन देवुन शिवीगाळ केली आहे . तसेच फिर्यादीच्या मुलीच्या पतीने फिर्यादीच्या मुलीच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिला उपाशी पोटी ठेवुन लग्नात घातलेले दागीने तिला घालण्यास न देता तिचा मानसिक छळ करून मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Share this: