क्राईम बातम्याबातम्या

ज्ञान्या लांडगे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई ;पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड मधील भोसरी परिसरात दहशत माजवणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या लांडगे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण ( मोक्का ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे .

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी ( दि . 22 ) याबाबतचे आदेश दिले . ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या रामदास लांडगे ( वय 28 ) , गणेश तिम्मा धोत्रे ( वय 27 , दोघे रा . गवळीमाथा , भोसरी ) , मल्लेश कोळवी ( वय 21 , रा . चिखली ) , कृष्णा विक्रम शिंदे ( वय 28 , रा . आदिनाथ नगर , भोसरी ) असे मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार , लांडगे टोळीतील चारही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे . या गुन्ह्यांच्या जोरावर ते परिसरात दहशत माजवत होते . स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी अलीकडच्या काळात संघटित गुन्हे करण्यास सुरुवात केली होती . या वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता . या प्रस्तावास अप्पर पोलीस आयुक्त पोकळे यांनी मोक्काचे आदेश दिले आहेत .

Share this: