अरे देवा..! पोलीस कर्मचा-यांनीच केले ट्रैफिक नियमांचे उल्लंघन ;नंबरप्लेट नसलेल्या गाडीवर भरधाव वेगात
दिपक साबळे..! पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील विविध चौक व रस्त्यांवर नो-पार्किंग, सम-विषम पार्किंग, वेगमर्यादा, एकेरी वाहतूक, अवजड वाहनांना बंदी, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मर्यादा,बिगर नंबर प्लेट न लावणे, प्रदूषण नियंत्रण, नो-हॉर्न झोन असे विविध नियमांचे पोलिस व महापालिका प्रशासनाने फलक लावले आहेत; मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे आणि हे नियम पोलीस प्रशासनच करत आहे .
पिंपरीतील कासारवाडी चौकात दोन चाकी वाहनांवर दोन महिला पोलीस कर्मचारी नंबरप्लेट नसलेल्या गाडीवर भरदिवसा जाताना दिसल्या समोर ट्रॅफिक पोलिस असताना देखील त्यांच्यावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही.
नागरिकांना लायसन्स पियुसी किंवा वाहणानावर फॅन्सी नंबरप्लेटवर असेल तर तत्काळ कारवाई करण्यात येते मात्र कायद्याचे नियम सांगणारे पोलिसच कायद्यांचे उल्लंघन करत असतील तर सामान्य माणसांनी नक्की कोणते आदर्श ठेवायचे.
पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौक व बाजारपेठेत कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहने बेशिस्तपणे थांबवली जातात. अनेक बेफिरपणे दामटतात. मात्र पोलिसच गुन्हा करत असेल तर त्यांना कोणी जुमानत नाही, अशी स्थिती आहे.