शहराला दिवसाआड पाणी केलं माञ पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी कशी रोखणार?
दिपक साबळे |
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना, आज शहरातील विविध भागात पाण्याची नासाडी होताना दिसत आहे काहीदिवसापुर्वी नेहरू नगर येथे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली त्यानंतर चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयासमोरच पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी झाली असाच प्रकार चोवीस तास पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाईपलाईन फुटून झाला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या असे प्रकार सर्रास घडत असलेले समोर येत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांध्ये नाराजीचे वातावर आहे. याच नाराजीमुळे संतप्त राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना आणि मनसेसह इतर पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे पालिकेचा निषेध म्हणून आंदोलन केली. कुणी हंडा मोर्चा काढला कुणी हंडा फोड मोर्चा काढला तर कुणी ढोल-ताशा आंदोलन करत दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेचा निषेध केला.
मात्र , शहरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होते यावर प्रशासन काही उपाययोजना करताना दिसत नाही किंवा यावर काही आंदोलनही करताना दिसत नाही या घटनेमुळे नागरिकांनामध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. नागरिकांना दिवसाआड पाणी दिल जात असताना अशा घटना घडतातच कशा? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.