सोशलमिडीयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी ;पिंपरीत संमाजकंटकाला अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) उद्या ६ डिसेंबर महामानव विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन असून पिंपरी चिंचवड शहरासह देशभरातील अनेक भीम अनुयायी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जात असतात. माञ सहा डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर पिंपरीतील एका समाजकंटकांनी आंबेडकरांची बदनामी कारक उल्लेख सोशलमिडीयावर केला आहे.

प्रकाश केनाराम चौधरी (वय-२६, राहणार, गीता कॉम्प्लेक्स नेहरूनगर पिंपरी पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.

तर गणेश राजू गायकवाड (वय – ३४ रा. नाणेकर चाळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश केनाराम चौधरी हा पिंपरीतील नेहरूनगर याठिकाणी रहात असून पिंपरी येथील गोकुळ हॉटेल शेजारील एका मेडीकल मध्ये तो नोकरी करत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची बदनामी करत त्याने सोशलमिडीयातील वाटसप स्टेट्स वापरले आहे. यामुळे दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने जाणूनबुजून केला आहे म्हणून आरोपीवर तात्काळ कारवाई केली आणि अटक करण्यात आली आहे .

Share this: