बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मास्क खरेदी गैरव्यवहार करणा-या संस्था, ठेकेदारांना तत्काळ काळ्यात यादीत टाका-खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :कोरोनाच्या महामारीत ठेकेदार ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ प्रकार करत आहेत. मास्क खरेदी, जेवण पुरवठ्यामध्ये गैरव्यहार, गैरप्रकार करणा-या संस्था, ठेकेदारांना तत्काळ काळ्यात यादीत टाकावे, अशी स्पष्ट सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

खासदार बारणे यांनी आज (सोमवारी) शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला विविध सूचना केल्या. तसेच पालिकेने पुरविलेले मास्त निकृष्टदर्जाचे असल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. भांडार विभागाने काही संस्थांचे मास्क चौकशी समितीला दिले नव्हते.

खासदार बारणे म्हणाले, ”पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा दर्जा चांगला नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. सुविधांचाही अभाव आहे. त्याकडे जातीने लक्ष घालावे. त्याठिकाणच्या तक्रारी येवू देवू नयेत. याची खबरदारी घ्यावी.

कोरोना संसर्गजन्य या प्रक्रियेत ठेकेदार ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ प्रकार करतात. मास्क खरेदी, जेवण पुरवठ्यामध्ये गैरव्यहार, गैरप्रकार करणा-या संस्था, ठेकेदारांना तत्काळ काळ्यात यादीत टाकावे”, असे बारणे यांनी आयुक्तांना सांगितले.

Share this: