जिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; पिंपळे सौदागर येथील जिम मालकावर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील गोल्ड जीम येथे व्यायाम करताना एका तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे तेथे साहित्य योग्य प्रकारे न ठेवल्याचे कारण देत व्यायाम करणाऱ्या एका युवकासह गोल्ड जिमचा मालक व दोन ट्रेनर वर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे हा घडला आहे.
तेजश्री भास्कर मोरे (वय २६, रा. पिंपरी) या तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. तर गोल्ड जिमचे मालक सनी गरेवाल, तेथे व्यायाम करणारा मुकेश सुखानी, ट्रेनर मुकेश कथुरडे, ट्रेनर रिटा अडगळे आदींवर निष्काळजीपणा करून तेजश्रीला जखमी करण्यास कारणीभूत झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजश्री मोरे या पिंपळे सौदागर येथील गोल्ड जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी जात होत्या . ९ नोव्हेंबरला मोरे या जिम मध्ये व्यायाम करताना तेथे साहित्य (वजने व अन्य मशीन) नीट ठेवले नव्हते. त्यामुळे मोरे हिच्या पायाच्या घोट्याला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे वरील लोकांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.