भारतीय राजकारणातील घराणेशाहीचा रोग कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर आहे:विक्रम पवार
भारतीय राजकारणातील घराणेशाही हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे नवयुवक शिक्षित वर्ग राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेत नाही असे दिसते . गावाच्या पारावर असो की संसदेच्या समोर मांडलेल्या चायच्या टपरीवर असो ‘राजकारण हे गजकरण असून राजकारणाच्या नादी लागू नका’ असा फुकटचा सल्ला या शिक्षित नवयुकांना दिला जातो, मात्र राजकारणातील घराणेशाहीवर बोलताना व्यक्त होत नाहीत, जोपर्यंत आपण राजकीय घराणेशाहीला समूळ उखडून फेकत नाही तोपर्यंत भारत प्रगतीपथावर जाणार नाही. राजकीय घराणेशाहीत कधीही राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिले जात नाही. कारण त्याठिकाणी मी आणि माझा परिवार एवढाच विचार केला जातो. स्वतः खासदार झाला की मुलाला नगरसेवक आणि भावाला आमदार असा कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम घराणेशाहीत ठरवला जातो.
तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे . सध्याच्या काळात नागरिक प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता असलेल्या व्यक्तींना पाठिंबा देत आहेत. माञ अजूनही देशातील राजकीय घराणेशाहीचा रोग पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. घराणेशाहीचा हा रोग कोरोना व्हायरसपेक्षा भयंकर आहे. यामुळे देशातील तरूणांचा अख्खी पिढी बरबाद होत आहे.
आपल्याकडे राजकारणात तरुण लोकांनी यायची गरज आहे. राजकारण समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तरुणांनी राजकारणात प्रवेश केल्याशिवाय लोकशाहीला कमजोर करणाऱ्या घराणेशाहीच्या विषाचा प्रभाव कमी होईल.भारतीय राजकारणात अजूनही काही लोकांच्या राजकारणाच केंद्रबिंदू हा त्यांचे कुटुंबच हा आहे. परिवाराच्या नावावर निवडणुका जिंकणे हे थांबायला हवे.
भारतात असा कायदा येणे गरजेचे आहे एका उमेदवाराला एकदाच संधी तो आमदार असो की नगरसेवक त्याला व त्याच्या परिवारातील सदस्यांना पुन्हा संधी नाही. हे सर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करावे कारण घराणेशाहीवर त्यांनी भरपूर प्रमाणात टिका करावी. आता बास! भारताच्या राजकारणात हा कायदा नरेंद्र मोदी यांनी आणला आणि सुरूवात त्यांच्यापासून केली तर नक्कीच आपला देश प्रगतीपथावर जाईल..
(लेखक : विक्रम पवार :मोबाईल नंबर- 96040 73265)