क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी केली अटक

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी-चिंचवड शहरात “करोना’चा प्रादुर्भाव वाढला आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “ सील’ करण्यात आले आहेत. या संधीचा गैरफायदा घेऊन पिंपरीतील दारू विक्रेते अवैधरित्या सर्रास दारू विक्री करत असताना पिंपरी चिंचवड पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.

धनराज रामचंद्र सुरेजा ( वय 55 , रा . वाघेरे पार्क , पिंपरीगाव ) आणि लखन मोहन रख्यानी ( वय 34 , रा . रमाबाई नगर , लिंक रोड , पिंपरी ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी राजाराम मारूती काकडे ( वय 49 ) यांनी शनिवारी ( दि . 11 ) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी यांनी आपसांत संगनमत करून पिंपरी भाजी मंडई येथील निक्की बिअर शॉपी हे दुकान शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास सुरू ठेवले . सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश असतानाही आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन केले . आरोपींकडन 40 हजार 428रुपयांच्या 483 दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत . आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188 , 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पिंपरी पोलीस तपास करीत आहेत .

Share this: