बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोरोना व्हायरस :पिंपरी चिंचवडमधील दापोडी, कासारवाडी, आजपासून सिल

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी-चिंचवड शहरात आटोक्‍यात येत असलेला “करोना’चा प्रादुर्भाव अचानकच वाढला आहे. करोना बाधित रुग्ण आढळल्याने आणि संसर्ग वाढण्याची शक्‍यता पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “ सील’ करण्यात आल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सील करण्यात आलेला भाग पुढीलप्रमाणे आहे, विनियर्ड चर्च परिसर , दापोडी ( माता शितळादेवी चौक – विनियर्ड चर्च – सुखवानी ग्लोरी – पब्लिक फुड शेल्टर – धुम स्टार मेन्स पार्लर – पिंपळेगुरव रोड – माता शितळादेवी चौक ) व डायमंड प्लास्टिक कंपनीजवळ कासारवाडी ( सिध्दार्थ मोटार कासारवाडी – दत्तमंदीर – पिंपळे भारत गॅस – सीएमई बॉन्डी – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सिध्दार्थ मोटार कासारवाडी ) चांदणी चौक ( पी . एम . टी . चौकाजवळ ) , भोसरी ( पुजा टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स – भोसरी मेन रोड – मॅन्जिनिस केक शॉप – मेघना सोनोग्राफी सेंटर – लांडेवाडी रोड – पि चिंमनपा भोसरी करसंकलन कार्यालय – भगवान गव्हाने चौक – लोंढे गिरणी हा भाग देखील कालपासून सील केला आहे . दरम्यान , पाच दिवसांपुर्वी गांधीनगर, खराळवाडी , दिघी , चिखली , थेरगाव परिसर सील केला आहे . त्यामुळे आजपर्यंत शहरातील सात परिसर सील करण्यात आले आहेत .

त्यानुसार सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे . सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक करण्यात येत आहे . तसेच आदेशामधील निबंधातून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या व्यक्तींना , कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने व शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना वगळण्यात येत आहेत . तरी नागरिकांना सहकार्य करावे या करीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आवाहन केले आहे .

Share this: