क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोविड सेंटरमधील तीसरी घटना उघडकीस :कोरोना बाधित मृत महिलेच्या अंगावरचे दागिने केले लंपास

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीतील नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमधील मृत कोरोना बाधित महिलेच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे .चाळीस हजार किंमतीचे १८ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागीने चोरल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (दि.09) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रणविर जवाहर ठाकुर ( वय -३३ वर्षे , रा . ६२३/१ बी . पोकले वस्ती , प्रसाद बिबवे नगर , लेन नं -० ९ , बिबवेवाडी , पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अज्ञात चोरटय़ा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमधील फिर्यादी यांच्या आईला कोवीड पॉझिटीव्ह असल्याने जम्बो कोवीड सेंटर नेहरुनगर पिंपरी येथे अॅडमिट केले असता त्यांचे रविवारी (दि.09) रोजी निधन झाल्याने त्यांची बॉडी फिर्यादी यांच्या ताब्यात दिली असता फिर्यादी यांच्या मयत आईच्या अंगावर असलेले चाळीस हजार किंमतीचे १८ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वतःच्या फायदयासाठी लबाडीने चोरुन नेले. आतापर्यंत नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीची ही तीसरी घटना उघडकीस आली आहे . या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: