क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत एकाचा खून करण्याचा कट पोलीसांनी उढळला

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये एकाचा खून करण्याचा कट पोलीसांनी पोलीसांनी उढळला आहे. खूनाच्या तयारीत असलेल्या दोघांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा कट 17 ते 19 सप्टेंबर 2023 या कालावधीत पिंपरी येथे रचला गेला होता.

पोलीस नाईक गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आकाश मनोज लोट (वय 22 रा. येरवडा) व कृष्णा उर्फ बॉक्सर बालू पारधे (वय 28 रा. पिंपरी) या आरोपिविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहीत वाघमारे हा 17 ते 19 या कालावधीत जेलमधून बाहेर येणार होता. या  कालावधीत त्याचा खून करण्याचा कट केला गेला. यासाठी ते अटकेपासून वाचण्यासाठी लपून फिरत होते. तसेच ते मोबाईल सिमकार्ड लपवून वापरत होते. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this: