बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

आयुक्त शेखर सिंह यांची तक्रार थेट अजितदादांच्या दरबारात

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त करसंकलन विभागातत चाललेल्या भ्रष्टाचारबद्दल अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची सोडून त्या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची पाठराखण करतात त्यामुळे आयुक्त शेखर सिंहची तक्रार थेट अजितदादांच्या दरबारात आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.

काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागा बद्दल नागरीकांच्या असंख्य तक्रारी असून या कडे महापालिका प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. करसंकलन विभागाचा निलेश देशमुख यानी चार्ज स्विकारल्यापासून या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. यामध्ये महापालिकेचे 500 कोटीच्या वर रुपयाचे नुकसान व स्वताचा फायदा देशमुख यांनी आपल्या शार्फ डोक्याने केला आहे.

या मध्ये मोबाईल टॉवरच्या नोंदीचे प्रकरण असेल, अनेक औद्योगिक शेडच्या चुकीच्या पध्दतीने लावलेल्या नोंदी असतील ,मोठमोठ्या मॉलला मिळकती मधून सुट देणे असेल अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी महापालिकेचे नुकसान केले आहे. या बाबत आम्ही देखील अनेकदा तक्रारी करून देखील आम्हांला उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नहेण्याचे काम देशमुख व शेखर सिंह व त्यांच्या विभागाने केले आहे. तसेच करसंकलन विभागातील कर्मचारी देखील प्रत्येक मिळकतीच्या नोंदीसाठी नागरीकाकडून पैसे घेऊन नागरीकांचे आर्थिक शोषन करत आहेत. तसेच वसुलीसाठी विभागात विशेष टिम यासाठी कार्यरत आहे. हे देखील शहरापासून लपलेले नाही. व प्रशासन अधिकारी, मडंलअधिकारी,गट लिपीक यांच्याकडून देखील वरिष्ठांना हप्ते दिले जात आहेत. या भ्रष्ट मार्गातून आलेल्या पैशातून काही प्रसिध्दीमाध्यमांचे हस्तक गोळा करुन आपली प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न निलेश देशमुख प्रमुख करत आहे.

 निलेश देशमुखने मी करसंकलन विभागाचा अता पर्यंत सर्वात जास्त महसुल गोळा केला असल्याचे पुढे करुन आपल्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्याचे काम करत आहे. आज सर्व शहराला माहित आहे, शास्ती कर माफ, हस्तांतरण शुल्क वाढ, महिला व अपंगाच्या नावे असलेल्या मिळकतीची सुट मधून केलेली कपात, तसेच मागील तीन वर्षाचा मागोवा घेतल्यास कोरानाच्या परिस्थितीमुळे सबंध दोन वर्ष विकासाचे चक्र थंडावलेले होते, त्यामुळे कमी झालेला भरणा त्यानंतर शहरातील पुर्ण झालेले हजारो गृह प्रकल्प यामुळे मिळकतीचा भरणा वाढण्यास मदत झाली होती. तसेच त्या विभागाचे अधिकारी म्हणून करसंकलन करण्याची जबाबदारी ही त्या अधिकाऱ्याचीच असते म्हणून देशमुख यांनी वेगळे असे काही केले आहेत म्हणून त्यांच्या चुकावर पडदा टाकण्याचे काम चुकीचे आहे. त्यामुळे निलेश देशमुख यांनी चार्ज स्विकारल्यापासून सर्व व्यावसायीक, औद्योगिक मिळकत नोंदीच्या सर्व विभागातील सर्वच फाईलची चौकशी करण्यात यावी. देशमुखचे अधिकार कमी न करता चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवा. व आयुक्त शेखर सिंह यांची देखील चौकशी करण्यात यावी. अन्यथा येत्या काही दिवसांत शहरभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.

Share this: