चिखलीतील पाटीलनगरमध्ये दारू खरेदीसाठी तळीरामाची गर्दी ; सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवडमध्ये दारु विक्री दुकाने सुरू करण्यास सोमवारी परवानगी मिळाली. त्यामुळे सकाळीच तळीरामाची सकाळपासूनच दारुच्या दुकानांबाहेर तोबा गर्दी केली आहे. चिखलीतील पाटीनगर परिसरात असलेल्या अजित वाईन शॉपसमोर सकाळी दहा वाजलेपासून रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टंसिंगचे यावेळी तळीरामांनी तीन तेरा केले आहे . त्यामुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये मंगळवारपासून शिथिलता आणली आहे. त्यामुळे दारु विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने निर्णय घेतला की तात्काळ दुकाने सुरू झाली. दुकानांबाहेर भल्या मोठ्या रांगा दिसत आहेत.
दरम्यान, रहिवाशी परिसरात असलेल्या वाईन शॉप आणि दारुविक्रीमुळे रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी संबंधित वाईन शॉप हटवण्याबाबत नागरिकांनी मागणी केली होती