नाशिकच्या पूजा पवार यांना ‘सावित्रीज्योती सन्मान 2023’ राज्यस्तरीय पुरस्कार
नाशिक (प्रतिनिधी) : निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय सावित्रीज्योती 2023 व क्रांतिसूर्य – जोतिबा फुले जीवनगौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा शहरातील रोटरी कम्युनिटी हॉल येथे रविवारी 29 ऑक्टोबर रोजी पार पडला. महाराष्ट्रातील कानाकोप-यातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी नाशिकच्या पूजा संतोष पवार यांना ‘सावित्रीज्योती 2023 चा राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते जोतिबा फुले व सावित्रीबाई यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जैतर चित्रपट फेम अभिनेत्री सायली पाटील, उपनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकाळे, प्रितीचा रंग उरी पेटला फेम अभिनेता प्रशांत केळकर, मिसेस इंडीया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, उदयोगपती मकरंद साळी तसेच संस्थेचे अध्यक्ष नीलेश आंबेडकर, उपाध्यक्ष सचिन धारणकर, सचिव राहुल सोनावणे पदाधिकारी अक्षय जाधव, राहुल बनसोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविका निर्वाण फाउंडेशनचे सचिव राहुल सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन संस्थेच्या पदाधिकारी तक्षशीला सोनवणे तिलोत्तमा बविस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्वाण फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.