वाहन धारकाची हप्त्याची वसुली थांबवावी ;आमदार प्रशांत ठाकूर यांना टुरिस्ट संघटनेची विनंती
मुंबई (वास्तव संघर्ष) कोरोना व्हायरस या आपतीला राष्ट्रीय आपती घोषित करून वाहन धारकाची होणारी मार्च महिन्यातील हप्त्याची वसुली व पुढील परिस्थिती व्यवस्थित होई पर्यंत बँका तसेच खाजगी फायनान्स यानी पुढील परिस्थिती सुरळीत होई पर्यंत हप्ते वसुली करू नये. अशी मागणी संघर्ष टुरिस्ट चालक मालक संघटनेने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना विनंती केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या भारतात व महाराष्ट्रात कोरोणा व्हायरस या रोगामुळे आणीबाणी ची परिस्थिती उदभवली असून त्यामुळे बसेस , ट्रक , व छोटे वाहन धारक याना भाडे मिळत नसल्यामुळे मालक व चालक याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे .
व तसेच बँका व खाजगी फायनान्स याचे हा महिना वर्षे अखेर असल्याने त्याची वसुली फार सक्तीची असते सध्याच्या परिस्थितीत चालक मालक याना जगणे मुश्किल झाले असताना ते हप्ते कोठून भरणार सध्या शाळांची ही परिक्षा चालू असून पुढील महिन्यात अॅडमिशनचा खर्च असल्याने चालक व मालक हवालदिल झालेले आहे . त्यामुळे आपणास या निवेदनाव्दारे विनंती कि , आपण वरिल विषय अत्यंत गंभीर असल्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करून सदरील आपतीस राष्ट्रीय आपती घोषित करून या गरीब व कष्टकरी चालक व मालक याना न्याय दयावा.