पिंपरी चिंचवडमध्ये जमावबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन ; रिक्षाचालकांने वाजवले नियमांचे तीन तेरा
पिंपरी (वास्तव संघर्ष) महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात जमावबंदीचे आदेश दिले आहे. मात्र हे सर्रास आदेश झुगारुन पिंपरी चिंचवड शहरातील खासगी वाहने जथ्थाचे जथ्थे नागरिकांची वाहतूक करताना दिसत आहेत.
पिंपरी ते काळेवाडी रोडवरील अशाच एका रिक्षा वाहतुक करणारा रिक्षा ड्रायव्हरने या नियमांचे तीन तेरा वाजवले आहेत. तीन पेक्षा नागरिकांनी एकञ येऊ नये असा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आदेश झुगारून चक्क या रिक्षाचालकांने मागे तीन पुढे दोन अशी वाहतूक करून वाहतुकीचे देखील बारा वाजवले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आज मंगळवार(24 मार्च) हे चिञ पाहायला पाहायला मिळत आहे. .पिंपरी-चिंचवड वाहतुक पोलिसांनी सर्व खाजगी वाहन धारकांना या संदर्भात पञ दिले असताना देखील असा आगाऊपणा हे रिक्षाचालक करतातच कसा? हा प्रश्न नागरिक विचारत आहेत
पोलीस निरीक्षक पिंपरी वाहतुक विभाग प्रदिप लोंढे यांनी सर्व खाजगी वाहतुक करणा-यांना पञ दिले आहे त्यात म्हटले आहे की, आपणास याद्वारे कळविण्यात येते की , सध्या कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात तसेच पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे . या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन मा . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी संपुर्ण महाराष्ट्रात फौजदारी प्रक्रिया संहीता कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेश लागु केले आहेत . त्यास आधिन राहुन आपणास खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात येत आहेत .
१ ) आपले ताब्यातील अॅटो रिक्षा किंवा टॅक्सी किंवा खाजगी प्रवासी बस किंवा प्रवासी वाहतुक करणारे इतर कोणतेही मोटारवाहन हे आपण सार्वजनिक रस्त्यावर आणणार नाही अथवा ते चालवणार नाही .
२ ) वरिल कोणतेही मोटारवाहन आपले ताब्यात घेऊन ते सार्वजनिक ठिकाणी ऊभे करुन ठेवणार नाही .
३ ) सदर वाहनांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती अथवा प्रवासी अढळुन आल्यास वरिल कलमांन्वये आपलेविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल .
४ ) शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे . तरी वरिल आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणावर प्रचलित कायद्यानुसर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी