क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळीसाठी केले 4 वर्षीय मुलीचे अपहरण

पिंपरी (वास्तव संघर्ष) : चिखली येथून संशयित नरबळीसाठी पळवलेल्या 4 वर्षीय मुलीचे जुन्नर पोलिसांनी सुटका केली आहे. अवघ्या काही तासातच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

आरोपी विमल संतोष चौगुले (वय 28 वर्षे) व तीचा पती संतोष मनोहर चौगुले ( वय 41 दोघे रा. महादेवनगर , जुन्नर ) यांना पिंपरी चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 जुलै रोजी रात्री 11 पासून रात्र गस्त चालू असताना 24 जुलै रोजी पहाटे 1 वाजता पोलीस अधिकारी उप निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली , की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलीस ठाण्यात एक चार वर्षांच्या अल्पवायीन मुलीचे कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय पळवून नेले आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना कळवले. संशयित आरोपीचे मोबाईल लोकेशन जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळले. तत्काळ पोलीस पथक आरोपीच्या मोबाईल लोकेशननुसार जुन्नरच्या जुन्या बस स्थानाकजवळ असणाऱ्या महादेवनगर येथे पोहचले . त्यांच्याजवळील मुलीची ओळख पटल्यानंतर त्या तिघांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले . आरोपी संतोष चौगुलेने सांगितले , की त्याच्या पत्नीने पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे बहिणीच्या शेजारी राहणाऱ्या मुलीस पळवून आणले आहे. पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मितेष घट्टे पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे .

Share this: