बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

विविध सामाजिक उपक्रमांनी अजितदादांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या प्रत्येक सेलच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. वाढदिवसानिमित्त समाजातील गरीब, गरजू नागरिकांना मदत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पर्यावरण रक्षण, रक्तदान यासारखे उपक्रम शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेला अन्नधान्याची मदत

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या भोसरी येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक आश्रामशाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला तसेच या शाळेला यावेळी अन्नधान्य साहित्याची मदत करण्यात आली. या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत यावेळी केक कापून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, मुख्यसंघटक अरुण बोर्हाडे, कामगार सेलचे शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्यासह संदीप शिंदे, दिपक गायकवाड, युवराज पवार, आकाश पालकर, शिवाजी वलवणकर, दत्तात्रय जगताप उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ शिंदे, दामोदर वहिले, सुरेश झावरे, मयूर देशमुख, सोपान म्हेत्रे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


उद्योग व्यापार सेलकडून विविध कार्यक्रम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व्यापार सेलच्या वतीने अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उद्योग व्यापार सेलच्या मोनिका संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. सांगवी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपन करण्यात आले. तर शाळेचे मुख्याद्यापक मापारी यांचा सत्कार माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, सतीश चोरमोले, सचिन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच परिसरातील महिलांनी आर्थिक स्वाक्षर व्हावे यासाठी गरजू महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासोबत व्यवसायासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मेमाणे यांनी केले.

बचत गट मार्गदर्शन मेळावा

प्रभाग क्रमांक १५ संभाजीनगर येथील साईमंदिरात अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परिसरातील महिलांनी मोठी हजेरी लावली होती. मार्गदर्शन मेळाव्यानंतर परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. हे दोन्ही कार्यक्रम माजी नगरसेविका मंगलाताई कदम यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले.

शिक्षकांचा सन्मान

शरदनगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचा यंदाच्या वर्षीचा दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून या शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान अजितदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा ज्योती गोफणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे व मुख्याद्यापक बाबाजी शिंदे उपस्थित होते.

मोशी येथे वृक्षारोपन
प्रभाग क्रमांक 4 मोशी येथे अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास माजी नगरसेवक वसंत बोराटे, माजी नगरसेविका मंदाताई आल्हाट, उत्तम आल्हाट, प्रकाश आल्हाट, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी, कैलास कुदळे, हरीभाऊ सस्ते, आतिष बारणे, प्रविण कुदळे, गणेश कुदळे, गणेश गायकवाड, सूरज कुदळे यांच्यासह मोशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this: