क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

म्हणून ‘त्या’ तरुणाला कुञ्यांसारखी वागणूक देत आरोपींनी जमिनीवरील बिस्किटे खाण्यास सांगितले

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या गुंडांची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एकिकडे गाड्यांची तोडफोड करणा-या आणि चो-या करणा-या आरोपींनी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता’ मला नावाने का बोलला, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत एका गुडांने तरूणाला शिवीगाळ तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले.ही घटना थेरगावातील गणेशनगर येथे घडली आहे.

याबाबत पिडीत 20 वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रोहन वाघमारे (रा. गणेशनगर थेरगाव), प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) या आरोपींविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन वाघमारे हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता.घटनेच्या वेळी आरोपी रोहनने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. पीडित तरुण भेटायला गेल्यानंतर आरोपीने तरूणाला तू मला फोनवर बोलताना . ‘भाई … का म्हटले नाही’ असे म्हणून अमानुष मारहाण करत कुत्रे खातात त्या पद्धतीने बिस्किटे खाण्यास भाग पाडत, कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्यांनी अमानुष पद्धतीने मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Share this: