पिंपरी चिंचवड शहरातील सलून आणि ब्युटी पार्लरची सर्व दुकाने चालू;आयुक्तांचे आदेश
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लर हे काही अटी – शर्तीवर सुरू करण्यास महापालिकेने अखेर परवानगी दिली आहे . त्यामुळे रविवारपासून ( ता . २४ ) सलूनची दुकाने खुली झाली आहेत . दाढी – कटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे नॅपकीन वापरण्यास प्रोत्साहित करण्याची सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेने केश कर्तनालय , सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांना केली आहे .
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली असून , अनेक व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास मुभा दिली आहे . त्यानुसार सलून आणि ब्युटी पार्लर यांनाही काही अटी – शर्ती आणि नियम घालून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी ( ता . २३ ) रात्री उशिरा परवानगी दिली होती .