बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कौतुकास्पद : विवाहाचा खर्च टाळून साने आणि गाढवे परिवारातर्फे महाराष्ट्र सरकारला एक लाखाचा धनादेश

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड मधील कोशेना विषाणूच्या अनुषंगाने साने व गाढवे परिवार यांच्या विवाहनिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये १,००, ०००/ – रूपये चेक स्वरुपात आर्थिक मदतीचे सहाय्य करण्यात आले. हे आर्थिक मदत पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने आणि साने आणि गाढवे परिवार उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक यांचा विवाह दि . १७ मे २०२० रोजीमुपो आवी , ता.जुन्नर येथे त्यांच्या पत्नीच्या घरी होता. माञ त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली जापत आणि लोकांचे विवाहनिमित्ताने होणा – या खर्चाला फाटा देऊन विवाह पुढेन ढकलता नियोजीत वेळी उपाययोजना करणे कामी महाराष्ट्र सरकारला छोटेसे आर्थिक सहाय्य केले आहे .

यावेळी नगरसेवक दत्ता काका साने म्हणाले, आमच्या साने व गाढवे या परिवारातर्फे आज महाराष्ट्र सरकारला कोरोना व्हायरस शी लढा देण्यासाठी एक लाखाचा धनादेश आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. खरं वधू आणि वराने हा निर्णय घेणे हे कौतुकास्पद आहे. सध्या जागतिक महामारी कोरोना विषाणू प्रती त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.तरी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकाने या महाराष्ट्र सरकारला आर्थिक सहकार्य करावे अशी आम्ही विनंती करतो

Share this: