वाढदिवसाचा खर्च टाळून तरूणाने केली गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना मदत
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीतील कुटुंबाला दररोज लागणारे रेशन देऊ केलं आहे. त्यामुळे या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नितूल पवार असं या तरुणाचे नाव आहे.
याबाबत नितूल पवार म्हणाले, करोनाचं संकट अवघ्या जगभरात पसरलं आहे. सर्वात जास्त फटका इतर देशांना बसला असून याचा प्रादुर्भाव भारतात देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान, करोनामुळे देशात आता तिसऱ्या टप्प्यात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.
यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या उपासमारीत झोपडपट्टीतील गोरगरिब उपाशी पोटी राहू नये या उद्देशाने मी महिनाभर पुरेल इतके रेशनिंग वाटप केले आहे.