बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील दापोडीत मटन चिकनच्या दुकानासमोर सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा

पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात तीस-यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेले नियम तोडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका भविष्यात अधिक वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. राज्यात संचारबंदी, लॉकडाऊन आहे. परंतु लोक नियम मोडत आहेत.

आज रविवार असल्याने अनेक जण मटन आणि मच्छी घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरात तोबा गर्दी करताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या पहाता आजच शासनाचे पुर्ण पिंपरी चिंचवड पुणे रेडझोन केले आहे माञ याकडे दापोडीकरांचे लक्ष दिसत नाही

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये काल एकाच दिवसात दोन कोरोना रुग्ण आढळले असून शहरात कोरोनाचे 115 रुग्ण झाले आहेत. मात्र असे असताना सोशल डिस्टन्सिंगचे भान नागरिकांमध्ये नाही अशी परिस्थिती आहे. लोकडाऊन 17 मेपर्यंत वाढल्यानंतर दापोडीतील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या चिकन – मच्छीमार्केट दुकानांपुढे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे

Share this: