बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जाती, धर्माच्या पलीकडे पिंपरीतील मुस्लिम तरूणांने केले काम;लाॅकडाऊनमध्ये १९४२७ लोकांना दररोज जेवण

दिपक साबळे…!

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : मजहब नहीं सिखाता… आपस में बैर रखना.. हींदी है हम हिंदोस्ताँ हमारा…. हे गीत तुम्ही बालपणी आणि अजूनही गात गुणगुण करत असताना देशभक्तीचा काटा आपुसुकच तुमच्या अंगावर येतो.. कारण या गाण्यात ना धर्म आहे ना जाती या गाण्यात आहे फक्त देशभक्ती.. कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 3 में पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता.. त्यानंतर आता 17 मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केंद्राने जाहीर केली आहे.. शासन आपल्या परीने काम करत आहे माञ आज मी तुम्हाला जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम तरूणाच्या कामाची माहीती देणार आहे.

या लाॅकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य आणि झोपडपट्टीतील गोरगरिबांना बसताना आपणास दिसत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम युवक अब्दुल शेख आणि त्याच्या सदस्य मिञांनी तब्बल १९४२७ लोकांना मोफत दररोज जेवण देत असून राशनिग किट १४ सामानसह ९७३ कुटुंबाला मोफत वाटप केले आहे.

याबाबत अमरज्योत सेवा संघ संस्था अध्यक्ष अब्दुल शेख यांनी वास्तव संघर्ष ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,पिंपरीत अमरज्योत सेवा संघ संस्थेच्या वतीने आम्ही लाॅकडाऊनमध्ये कोणताही गोरगरिब उपाशी पोटी राहू नये यांची खबरदारी घेतली आहे. आतापर्यंत १९४२७ लोकांना शिजवलेले जेवण पैक करून अजूनही वाटत आहोत. तसेच प्रत्येक कुटुंबाला लागेल असेल १४ सामान सह ९७३ कुटुंबाना रेशनिंग किट देखील दिले आहे. यामध्ये निराधार नागरिक / बैघर नागरिक / शासकीय बंदोबस्त अधिकाऱ्यानां संध्याकाळ चे जेवण दररोज विविध प्रकार चे जेवण वाटप सह पाण्याची बाॅटल असा उपक्रम देखील आम्ही दररोज करत आहोत.

अर्थातच हे माझ्या एकट्याचे श्रेय नसून अमरज्योत सेवा संघ संस्था यांचे सदस्य आकाश कांबळे, मनोज मोरे,मोन्टी डिसोजा व कायँकर्ते
तयब ईनामदार,संतोष शिगे,महेंद्र व्हळकलस इतर नागरिकांनी स्वता शेयर काढून जनता कर्फू पासून जेवण बनवून वाटत केले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो.

तुम्हाला अब्दुल शेख यांनी केलेल्या कामाचे कौतुक करायचे असेल तर आम्ही त्यांचा संपर्क देत आहोत एक कौतुकाची थाप म्हणू त्यांना अवश्य संपर्क साधावा

अब्दुल शेख यांचा संपर्क – 91 95952 50045

Share this: