क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ;एक आरोपी अटक तीन फरार

पिंपरी (वास्तव संघर्ष) स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणा-या चार आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांना पैशाचे आमिष दाखवून हे चारही आरोपी त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते . ही कारवाई सोमवारी (दि.14 ) पाचच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्टेशनसमोर देवयानी दिप इमारतीच्या वरच्या मजल्यावर भाजी मंडई पिंपरी येथे छापा टाकून पोलिसांनी केली.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस जमीद तांबोली यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार राहुल जाधव, वैशाली मॅडम, वैभव (पुर्णनाव पत्ता माहित नाही) अक्षय शरद भालेराव (वय-23 रा. निगडी गावठाणमध्ये निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पैश्याचे आमिष दाखवून महिलाकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी पिंपरी रेल्वे स्टेशनसमोर देवयानी दिप इमारतीच्या वरच्या मजल्यावर सृष्टि स्पा सेंटरवर छापा टाकला असता ही बाब उघडकीस आली . अक्षय भालेराव या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे बाकीचे साथीदार फरार झाले आहेत. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: