क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून हत्या

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये एका अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. लैंगिक अत्याचाराचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काल रात्री दीड वाजता अडीच वर्षांची ही मुलगी पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून बेपत्ता झाली होती. या चिमुकलीसोबत काही गैरप्रकार झाला आहे का? याची माहिती पोस्टमार्टेम अहवालातून समोर येईल. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे..

पिंपरी चिंचवडच्या सांगवी भागात राहणारी अडीच वर्षीय चिमुकली सोमवार संध्याकाळी घराबाहेर गेली आणि त्यानंतर परतच आली नाही. कामगार वसाहतीमध्ये राहत्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी जवळपासच्या सर्वत्र परिसरात तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही.

मात्र तिचा मृतदेह मंगळवारी (23 जुलै) सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलिटरी परिसरात आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस घटनास्थळी पोहोलचे आणि चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध रुग्णालयात नेण्यात आला. या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्याप शवविच्छेदन अहवालानंतरण तिच्या सोबतकाही गैरप्रकार झाला आहे का? आणि मृत्यु नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती स्पष्ट होईल

Share this: