ओटास्कीम येथे दोघांवर कोयता आणि तलवारीने वार ;तिघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी ( वास्तव संघर्ष ) : – टु व्हिलरवचा हॉर्न वाजवला याचा राग येऊन दोघांवर तलवारीने व लोखंडी कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे. निगडी परिसरातील सहयोग नगर स्वामी विवेकानंद शाळेसमोर ओटास्कीम येथे बुधवारी ( दि . 25 ) रात्री घडली .

याप्रकरणी अजय प्रकाश सोनवणे (वय २४ वर्षे , रा . दळवीनगर पञाशेड काळभोर गोठा , निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

अमोल वाले, राजु वाले , आनंद वाले (सर्व रा . सहयोग सोसायटी निगडी पुणे )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी अजय हे आपल्या टु व्हिलरवरुन जात असताना मुले तेथे क्रिकेट खेळत असलेले अजय याला दिसले त्यामुळे त्याने आपल्या टु व्हिलरवचा हॉर्न वाजवला याचा राग येऊन चिडुन आरोपी अमोल वाले यांनी हातामध्ये लोखंडी कोयते घेवुन व तलवार घेवुन पळत येवुन परीसरात दहशत निर्माण केली तसेच आरोपी अमोल वाले राजु वाले , आनंद वाले यांनी फिर्यादी अजय याला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तलवारीने व लोखंडी कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत करुन त्याचा मिञ प्रसाद क्षिरसागर यास देखील मारहाण करुन जखमी केले. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: