बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संविधान गौरव दिनानिमित्त लढा यूथ मूव्हमेंटकडून शहरात भव्य बाईक रॅली

पिंपरी (वास्तव संघर्ष) – 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त लढा यूथ मूव्हमेंट कडून संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शहरात भव्य संविधान गौरव बाईक रॅली काढण्यात आली.तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

उरुवेला महाबुद्ध या ठिकाणी विचार विनिमय कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी प्रमोद क्षिरसागर म्हंटले की, उत्तर प्रदेश सरकारने नुकताच लवजिहाद च्या नावाखाली अंतरधर्मीय विवाहात जाचक अटी घालून स्पष्ट विरोध केला आहे व त्याच नंतर सामूहिक धर्मांतरा विरुद्ध कठोर कायदे करून भारताच्या संविधानाची गळचेपी केली आहे, असेच नवनवीन कायदे करून भारतीय संविधान संपवण्याचा घाट केंद्र सरकार मार्फत भाजप शासित राज्यात घातला जात आहे. जर भविष्यात संविधान अबाधित राखायचे असेल व संविधान दिन साजरा करायचा असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे व संविधानाला मानणाऱ्या लोकांना मातांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठवणे गरजेचे आहे.संविधान दिनाचे औचित्य साधून लढा यूथ मूव्हमेंट च्या प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रजनीकांत क्षिरसागर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे पुणे जिल्हा अध्यक्ष धीरज बगाडे तसेच सुधाकर म्हस्के, दीपक भालेराव, रमेश शिरसाठ, अनिल गोरे, बबन हिवाळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते, लढा यूथ मूव्हमेंट चे प्रमुख प्रमोद क्षिरसागर,भैय्यासाहेब ठोकळ, अमित गोरे, पंकज धेंडे, संदीप माने, राकेश माने, आप्पा कांबळे, सिद्धार्थ मोरे, समाधान कांबळे,गौतम कांबळे यांच्याकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Share this: