बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष):ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस तसेच मोशी येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिकेच्यापिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमास माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य मारुती भापकर, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे , सुप्रिया सोळांकुरे, शारदा मुंढे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

मोशी येथील महापालिकेच्या शाळेमधील झालेल्या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, मुख्याध्यापिका छाया शिंदे तसेच शिक्षक माया लोखंडे, संगिता सस्ते, राजेंद्र पानसरे, उमेश सूर्यवंशी, संतोष शितोळे, सागर नेटके यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.  

Share this: