काळेवाडीतील वकील खून प्रकरण:तीन आरोपींना नांदेडमधून अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष ):काळेवाडी येथून वकीलाला अपहरण करून त्याचा खुन करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.ही घटना सोमवारी उघडकीस आली होती.
शिवशंकर दत्तात्रय शिंदे या वकिलाचा अपहरण करून खून करण्यात आला.
राजेश्वर गणपत जाधव( वय-42, रा. आझाद कॉलनी, काळेवाडी, पुणे मुळगाव भक्तापुर, ता. बेंगलुर, जि. नांदेड), सतिश माणिकराव इंगळे, (वय-27, रा. भक्तापुर, ता. बेंगलुर, जि. नांदेड ) ,बालाजी मारुती एलनवर, वय-24 वर्षे, रा. भवतापुर, ता. बेंगलुर, जि.. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे वकील असून काळेवाडी पिंपरी पुलाजवळ त्यांचे कार्यालय आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी शिंदे हे बेपत्ता झाले. शोध घेऊनही ते न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलीस तपासामधून आरोपी राजेश्वर व त्याची पत्नी स्वाती यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात दाखल होते.अॅडव्होकेट शिवशंकर व स्वाती यांचेत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून आरोपी राजेश्वर याचे व अॅडव्होकेट शिवशंकर यांचेत क्लेश निर्माण झालेला होता. राजेश्वर जाधव याचा स्वभाव रागीट असल्याचे व त्यानेच अॅडव्होकेट श्री. शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांना पळवून नेले असावे असा अंदाज व्यक्त करून सदर दिवशी राजेश्वर जाधव याचा फोन बंद असल्याचे स्वाती यांचेकडुन समजले. तांत्रिक मदतीने आरोपी नांदेड येथे असल्याचे पोलिसांना समजले.त्यानुसार पोलिसांनी बेंगलुर जि.नांदेड येथील पोलीसांबरोबर समन्वय साधुन आरोपींना अटक केली.
दरम्यान ,अॅडव्होकेट शिवशंकर यांना त्यांचे कार्यालयात जावून तोंडास चिकटपटटी लावुन त्यांना प्लॅस्टीक निळया ड्रममध्ये ठेवुन अशोक लेलैन्ड टैम्पो क्र.. एन. एच. 14/ के.ए./8116 यामधुन चिन्नम्मा कोरी मंदीराजवळ, जिल्हा कामारेड्डी, राज्य तेलंगणा येथे नेऊन त्यांना जिवे मारून त्यांची मयत बॉडी जाळण्याचा प्रयत्न केल्याने मदनुर पोलीस ठाणे, तेलंगणा येथे गु.र.नं. 2/2023, भा.द.वि. कलम 302.201 अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदरचा गुन्हा वाकड पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला आहे. वरील तिन्ही आरोपींना पिंपरी चिंचवड येथे आणुन वाकड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन त्यांना मा. न्यायालयात हजर करून त्यांची तपासकामी 10 दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली असुन पुढील तपास वाकड पोलीस ठाणे करीत आहे.