पिंपरी चिंचवड ;च-होलीत आढळले दोन रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह
पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी-चिंचवड शहरातील आता झपाट्याने कोरोना बाधित रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कालच नवीन चार रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. त्यामध्ये 42 वर्षाची महिला रुग्ण . तर,19, 31 आणि 33 वय असलेल्या पुरुषांचेही अहवाल करोना बाधित आले होते. आज सकाळी आणखी दोन जणांचा कोरोना रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.
हे दोन्ही रूग्ण पिंपरी चिंचवड शहरातील च-होली येथील असून येथील असून कोरोना बाधित पुरूषांचे वय – ४३ तर महिलेचे वय ३८ आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 41 वर पोहचली आहे. शहरात आत्तापर्यंत एकूण 54 जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.