बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवाणीसाठी काम करतात – नामदेव ढाके

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे डॅशिंग आणि प्रामाणिक पोलीस आयुक्त म्हणून शहरात प्रसिद्ध आहेत. पोलिसांची गुन्हेगारांना भिती वाटावी अशी त्यांची छबी आपणांस वेळोवेळी पाहायला मिळत आहे.पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच माझे टार्गेट आहे.शहरात कोणाचीही दादागिरी पोलीस खपवून घेणार नाहीत गुन्हेगार हा कोणत्याही पक्षाचा असला तरी आमचा त्याच्याशी संबंध नाही. कारण तो आमच्यासाठी फक्त गुन्हेगार असतो. कायदा सर्वांना सारखा असून, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही’, अशा शब्दांत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेळोवेळी पञकार परिषदेत सांगितले. मात्र आता त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे भाजप पक्षाचे माजी उपमहापौर , नगरसेवक केशव घोळवे यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.ही अटक राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक डब्बू आसवांनी यांच्या ईशा-यावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली असून कृष्ण प्रकाश हे डब्बू आसवांनीसाठी काम करतात असा घाणाघाती आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज केला. ते आज गुरुवार (दि. 17) रोजी आयोजित पञकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ढाके म्हणाले, नगरसेवक केशव घोळवे यांना ज्या दिवशी अटक करण्यात आली, त्याच दिवशी सकाळी राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवांनी यांनी पोलिस आयुक्त कृष्ण यांना पञ दिले होते. याची कसलीही खातरजमा किंवा चौकशी न करता त्याचांच कोणी शेख नावांचा माणूस तक्रार दाखल करतो तसेच गुड्डू यादव या इसमावर पोलिसांनी दबाव आणून फिर्याद देण्यास सांगितले. कुठल्याही स्वरूपाचा पुरावा नसताना नगरसेवक केशव घोळवे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्यात आले.त्यामुळे आयुक्त कृष्ण प्रकाश हे खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवांनीयांच्या साठी काम करतात हे सिद्ध होत आहे.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे,पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर नानी घुले, माजी उपमहापौर केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेविका माधवी राजपुरे,ज्येष्ठ नगरसेविका झामाताई बारणे उपस्थित होते.

मी निर्दोष आहे, माझ्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व मला बदनाम करण्याचा प्रकार झाला आहे. या घटनेचा मी स्वतः निषेध करतो तसेच मी कोणालाही पिंपरीतील नेपाळी मार्केटमधील लोकांकडून कसलीही पैशाची मागणी केली नाही. धमकावणे तर खूप दुरान्वये आहे. हे संपूर्ण षडयंत आहे.तसेच पोलीस चौकशी मध्ये पूर्ण सहकार्य केलेले आहे.माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. मी निर्दोष आहे. माझ्या बाबत राजकीय षड्यंत्र वापरून शकुनी चाल केलेली आहे.परंतु या शहरातील तमाम गोर गरीब, कामगार गप्प बसणार नाही. ते निवडणुकीमध्ये ज्यांनी हे कटकारस्थान केलेले आहे त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे आयोजित पत्रकार परिषदेत घोळवे यांनी सांगितले.

Share this: