क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आमदार आण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण :आणखी दोघांना पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी पवार यांचे अपहरण करून त्यांच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी आमदार आण्णा बनसोडे यांचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी व निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यातील आणखी दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे . यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती .

साजिद महिबुब शेख ( वय 21 , रा . अल्फाइन गार्डन सोसायटी बिल्डींग नंबर फ्लॅट नंबर 204 , गणेश मंदिराजवळ कृष्णा नगर म्हेत्रे वस्ती चिखली पुणे ) , रोहित अशोक कुसाळकर ( वय 20 , रा . पवार चाळ राम मंदिराच्या पाठीमागे राम नगर चिंचवड पुणे ) अशी खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . सुलतान इम्तीयाज कुरेशी ( वय 20 , रा . आंनदनगर , चिंचवड ) , रोहीत उर्फ सोन्या गोरख भोसले ( वय 20 , रा . गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी , चिकन चौक , ओटास्किम , निगडी ) यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार आण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि 12) रोजी आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला . या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली . याप्रकरणी आमदार समर्थकाने दिलेल्या फिर्यादीनुसार , तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . आमदार बनसोडे व कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले . मात्र , याच्या परस्पर विरोधी तक्रार करण्यात आली . त्यात आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याच्यासह त्याच्या साथीदारांवर पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल केले .

त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील , पोलीस नाईक संदीप पाटील , पोलीस शिपाई मगर , गारगोटे असे वरील गुन्ह्यातील आरोपींचा पिंपरी , चिंचवड , चिखली आणि निगडी परिसरात शोध घेत होते . त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की , आरोपी साजिद आणि रोहित मंगळवारी (दि. 18)चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डन समोर येणार आहेत . त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली . अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Share this: