बातम्यामनोरंजन जगत

‘या’ कारणामुळे झाले गायक बप्पी लाहिरी यांचे निधन

मुंबई (वास्तव संघर्ष) : हिंदी सिनेसृष्टीतली ज्येष्ठ गायक संगीतकार बप्पी लाहिरी यांचं मुंबईतल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. डॉक्टरांनी सांगितले की, 18 दिवस आयसीयूमध्ये राहिल्यानंतर, जेव्हा सर्व पॅरामीटर्स सामान्य झाले, तेव्हा बप्पी लाहिरी यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

डॉक्टरांनी सांगितले की बप्पी दा यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. मंगळवारी रात्री ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया) या कारणामुळे त्यांचे निधन झाले. गेल्या वर्षी त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना जुहू येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ते काही दिवसांतच कोरोनामधून बरे झाले.

आलोकेश लाहिडी असं त्यांचं नाव असून त्यांना सगळे बप्पी लहरी या नावानं ओळखत होते . बप्पीदा नावानं प्रसिद्ध असलेल्या लाहरी यांना ते परिधान करत असलेल्या प्रचंड सोन्यामुळंही वेगळी ओळख मिळाली होती.वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. 80 च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळं त्यांना डिस्को किंग असं म्हटलं जात होतं. बप्पीदा यांनी पाच दशकापेक्षा जास्त संगीत क्षेत्रात काम केले आहे. तसेच त्यांना फिल्मफेअर तर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Share this: