बातम्या

हातात कोयते घेऊन टोळक्यांनी केली गाड्यांची तोडफोड

पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे गुरव भागातील ओंकार कॉलनीमधील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षा, कारसह सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली. हातात कोयते घेऊन दहशत माजवत टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपळे गुरवमधील ओंकार कॉलनी मध्ये रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी गाड्याचे या घटनेत नुकसान झाले आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ओंकार कॉलनीमध्ये गाडी घेऊन येत असताना चांदणे यांच्या गाडीवर अज्ञात टोळक्याने हल्ला केला. यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. त्यांच्या पुतण्याला काच लागली असून, वाहनातील तिघे जण सुदैवाने बचावले आहेत. चांदणे यांच्या वाहनांवरच हल्ला का करण्यात आला. पूर्वीची काही भांडणे आहेत का?याची चौकशी पोलीस करीत आहेत. घटनेनंतर यातील संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. 

Share this: