बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ते गरीब आहेत साहेब लाचार नाहीत.. हातावर पोट असणाऱ्या गरीबांची हेळसांड थांबवा – गणेश आहेर

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरात लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणारे गोरगरिब रेल्वे स्टेशन जवळील मोकळ्या मैदानात भरणारे भाजी विक्रेत्ये लोकडाऊंड मूळे बंद असलेल्या कपडा मार्केट मधील दूकानाचे बाहेर तसेच रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहेत. त्या ठिकाणी रोजच्या रोज अतिक्रमण पथक त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई करून त्यांची वारंवार हेळसांड करत आहेत ते गरीब आहेत लाचार नाहीत याचा विचार माञ महापालिका करत नसल्याचं दिसून येत आहे

त्यांना त्यांच्या जून्या रेल्वे स्टेशन रोड जवळी मोकळ्या मैदानात आहे त्या जागेवर बसण्याचे परवानगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा श्रावण हर्डीकर यांनी द्यावी जेणे करून वाढत अतिक्रमण रोखता येईल अशी मागणी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर प्रसिध्दी पञाकाच्या माध्यमातून करत आहेत. लोकडाऊंडचे संधी साधून केलेले अतिक्रमण कारवाई हि गोरगरीबांचे उपासमारी करणारे फसवी कारवाई ठरले आहे.

येणा-या काळात ह्या सर्व भाजी विक्रेते. फळ विक्रेते. चावी विक्रेते. मसाला विक्रेते व हाॅकर्स धारकांच आहे त्याच जागेवर पुनर्वसन करावी आशी मागणी देखील गणेश आहेर यांनी केले आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सर्व हाॅकर्स आपल उपजिविका असणार व्यवसाय सूरू होईल ह्या आशीवर बसले आहेत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने हाॅकर्स धारकांचे उपासमार होणार नाही याचे दखल घेवून त्यांना छोटासा व्यवसाय सूरू करण्यासाठी परवानगी द्यावी.

Share this: