आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभरात 414 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना व्हायरस पाॅझिटिव्ह रूग्णांची आजची ( शुक्रवारी )संख्या 414 झाली आहे .पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण असून ‘ ड ‘ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 71 नवीन रुग्ण सापडले तर ‘ ब ‘ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 67 नवीन रुग्ण सापडले आहेत . उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सांगवीतील 77 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला .

आजपर्यंत 1 लाख 4911 जणांना कोरोनाची लागण झाली आहे . त्यातील 99 हजार 743 जण बरे होऊन घरी गेले आहेत . शहरातील 1837 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 772 अशा 2609 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . सध्या 833 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत . तर , 875 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत . आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 22 हजार 826 जणांनी लस घेतली आहे.आज दिवसभरात 1197 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे .

Share this: