पिंपरी चिंचवडमधील प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत २७ फेब्रुवारीला होणार
पिंपरी (वास्तव संघर्ष) :केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी च – होली , रावेत व बो – हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे . या प्रकल्पाची सोडत दि .२७ / ०२ / २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे केंद्रीय पर्यावरण मंत्रीी प्रकाश जावडेकर , यांचे शुभहस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे या राहतील .
विशेष उपस्थिती आमदार लक्ष्मण जगताप , आमदार .महेश लांडगे तसेच प्रमुख उपस्थिती खासदार श्री.श्रीरंग उर्फ आप्पा बारणे , . खासदार सुप्रिया सुळे , खासदार डॉ.श्री . अमोल कोल्हे , मा.आमदार श्री . संग्राम थोपटे प , श्री.आण्णा बनसोडे यांची असेल . सदर योजनेस मा.महापालिका सभेने ठराव क्र .५१ ९ , दि .२६ / ०२ / २०२० अन्वये मान्यता दिलेली आहे . या योजनेसाठी दि . १७/०८/२०२० ते १०/१०/२०२० या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविणेत आले आहेत . या योजनेकरिता एकुण ४७८७८ इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४७७०७ अर्ज पात्र ठरलेले आहेत .
सदर प्रकल्पाच्या अंतर्गत चव्होली १४४२ , रावेत – ९ ३४ व बोहाडेवाडी -१२८८ अशा एकुण ३६६४ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे . या योजनेकरिता अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण असेल . या योजनेकरिता ३६६४ सदनिकेची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे .
या प्रकल्पामध्ये सदनिका धारकास प्रथमतः १० % स्वहिस्सा भरावा लागेल . या योजनेची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook ( Link www.facebook.com/pcmcindia.gov.in ) Live YouTube ( Link www.youtube.com/PCMCINDIA ) द्वारे दाखविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून उपस्थित न राहता वरील प्रमाणे दिलेल्या लिंकवर जावून ऑनलाईन उपस्थित राहावे.
सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येईल , अशी माहिती महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली .