बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संग्रामनगर बाधित लोकांचे पिंपरीतील विठ्ठलनगर येथील इमारतीमध्ये पुनर्वसन

पिंपरी(वास्तव संघर्ष) : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये सदनिका प्राप्त झालेल्या लाभार्थींसाठी आजचा सोनेरी दिवस आहे. प्राप्त वास्तूसह इमारत स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी लाभार्थींची असून उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने स्वछाग्रही असावे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

संग्रामनगर येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या॑चे पुनर्वसन पिंपरी येथील विठ्ठलनगर येथील इमारतीमध्ये करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, केंद्र शासन व राज्य शासन यांचे सहकार्याने जेएनएनयुआरएम बीएसयुपी अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये 112 लाभार्थींना सदनिकांचे संगणकीय सोडतीद्वारे वाटप करण्यात आले. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज हि संगणकीय सोडत काढण्यात आली.

चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये झालेल्या या सोडतीवेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसेविका कमल घोलप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी ,प्रशासन अधिकारी श्रीनिवास कोळप यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, स्वतःच्या हक्काचे घर मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी महानगरपालिकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून गृहयोजना राबवली. अनेकांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. सदनिकांमध्ये पुनर्वसन झालेल्या नागरिकांनी पत्राशेड सोडावी यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे. सदनिकाधारकांनी सोसायटी निर्मिती नंतर इमारतीची देखभाल ठेवली पाहिजे. याकरिता आवश्यक शुल्क देखील सभासदांनी भरले पाहिजे असेही महापौर ढोरे म्हणाल्या.

Share this: