पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे शिपाई पदासाठी लेखी परीक्षा
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे शिपाई पदासाठी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये 444 परीक्षा केंद्र राहणार असून, 11 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला
आहे.ही लेखी परीक्षा शुक्रवार(दि.19) नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 4:30 या वेळेत होणार आहे.
पोलीसांनी दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या 720 जागांसाठी राज्यभरातून भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत आहे.
तरुणांनी सादर केलेल्या अर्जांपैकी पात्र ठरलेल्या 1,90,319 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षार्थीची संख्या मोठी असल्याने त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. परीक्षार्थीनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. हॉल तिकीट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक आहे. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीचे व्हिडिओ शूटिंग होणार आहे.