बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुराज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकारून लोककल्याण केले-महापौर माई ढोरे

पिंपरी (वास्तव संघर्ष) : छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आबाल वृद्धांच्या उपस्थितीत आज शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रजाहितदक्ष रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुराज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकारून लोककल्याण केले असे प्रतिपादन  महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. शिवजयंतीनिमित्त शहरवासीयांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.


प्रारंभी मुख्य प्रशासकीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, उद्यान अधिक्षक संजय गोसावी, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी भक्ती शक्ती चौक, एच . ए. कॉलनी पिंपरी, कासारवाडी,  फुगेवाडी आणि दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांनी लांडेवाडी चौक, भोसरी पी.एम. टी. चौक, मोशी गांव वेशीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मोहननगर, प्रेमलोक पार्क, थेरगांव डांगे चौक, थेरगांव गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

भक्ती शक्ती चौक निगडी, येथील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य अमित गावडे, अजित गव्हाणे, नगरसदस्या कमल घोलप, शर्मिला बाबर, शैलजा मोरे, सुमन पवळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य मारुती भापकर, भीमा बोबडे यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. एच . ए. कॉलनी पिंपरी येथील कार्यक्रमास नगरसदस्या सुलक्षणा धर उपस्थित होत्या. कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी येथील कार्यक्रमास नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित काटे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, स्वाती काटे उपस्थित होते.

लांडेवाडी चौकात झालेल्या कार्यक्रमास नगरसदस्या सोनाली गव्हाणे, क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर शाळकरी मुले छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेष परिधान करून कार्यक्रमात उपस्थित होते. भोसरी पीएमटी चौकातील कार्यक्रमास नगरसदस्य संतोष लोंढे, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, प्रशासन अधिकारी नाना मोरे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. मोशी येथील कार्यक्रमास नगरसदस्य लक्ष्मण सस्ते, नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, माजी उपमहापौर शरद बोराडे यांच्यासह मोशी ग्रामस्थ उपस्थित होते.

मोहनगर येथील कार्यक्रमास नगरसदस्या मीनल यादव, वैशाली काळभोर, माजी नगरसदस्य मारुती भापकर उपस्थित होते. थेरगांव डांगे चौक येथील कार्यक्रमास ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, माजी नगरसदस्य सिद्धेश्वर बारणे उपस्थित होते. थेरगांव गावठाण येथील कार्यक्रमास ग प्रभाग अध्यक्षांसह  अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते

Share this: