बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

झोपडपट्टीतील मुलांना घेऊन पोलीस आयुक्तांनी बनवली ‘झुंड’ फुटबॉल टिम

पिंपरी (वास्तव संघर्ष) :डॉ. नागराज मंजुळे यांनी सत्य घटनेवर आधारित झुंड चिञपट झोपडपट्टीतील नवख्या मुलांना घेऊन तयार केला. अक्षरशः या चित्रपटाने बाॅलिवुडमध्ये धुमाकूळ घातला. बाॅक्स ॲाफिसचे सर्व रेकॉर्ड तोडून एक नवा इतिहास या चित्रपटाने रचला. झोपडपट्टीत फक्त गुन्हेगारच जन्मतात या संकल्पनेला फाटा मारुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज मंगळवारी (दि.29) रोजी नागपुर येथे होणाऱ्या ” स्लम सॉकर ” या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी झोपडपट्टीतील मुलांना संधी दिली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या किडा उपक्रमांतर्गत झोपडपट्टी भागातील मुलांची निवड झाल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हिरवा झेंडा दाखवुन पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड येथुन सर्व खेळाडूना स्पर्धेसाठी नागपुर येथे रवाना केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घडणा-या विविध गुन्ह्यातील सहभागामध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.अशा बालकांना योग्य वेळी समुपदेशन व मार्गदर्शन न केल्यास अशी बालके कायमस्वरूपी गुन्हेगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अनुषंगाने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणा-या अल्पवयीन बालक व गुन्हेगारी मार्गावरील दिशा भरकटलेल्या बालकांसाठी गेली दोन वर्षे त्यांच्या उर्जेला योग्य दिशा मिळावी या दृष्टिकोनातुन झोपडपट्टी भागात विशेष बाल पथक गुन्हे शाखा यांच्या मार्फतीने क्रिडा उपक्रम राबविण्यात येत असून सदरचे क्रिडा प्रशिक्षण संदेश बोर्डे हे देत असुन त्यांच्या मागदर्शनाखाली एक उत्कृष्ठ फुटबॉल टीम तयार झालेली आहे.

दिनांक 31 मार्च 2022 रोजी पासून “स्लम सॉकर ” या महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेकरीता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या क्रिडा उपक्रमांतर्गत हद्दीतील 10 उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची निवड झाल्याने आज सर्व खेळाडुंना किडा प्रशिक्षकासह नागपुर येथे फुटबॉल स्पर्धेसाठी पाठविण्यात आले आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व खेळाडुंचे स्वागत करून त्यांना फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा देवून कोणत्याही खेळामध्ये हार व जीत ही होतच असते तुमची या स्पर्धेसाठी निवड झाली हाच तुमच्यासाठी एक खुप मोठा विजय आहे . खेळाडुंची ही पिढी नवीन दिशा देणारी आहे तुम्ही झोपडपट्टी भागातील दिशा भरकटलेल्या मुलांसाठी एक चांगला आदर्श बनणार आहात. आपण खेळ जिंकण्यापेक्षा तो खेळ किती प्रामाणिक होऊन खेळलो यातुनच आपल्याला समाधान मिळणार आहे असे बोलुन उपस्थित सर्व खेळाडुंये मनोबल वाढवुन त्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

Share this: