क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीत गुंडाचा हैदोस ;हत्याराचा धाक दाखवून परिसरात दहशत

चिंचवड (वास्तव संघर्ष) :दारू प्यायला दोनशे रूपये दिले नाही म्हणून
चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीत गुंडांनी परिसरात हैदोस घातला. ही घटना (दि.8) रोजी दुपारच्या सव्वाएकच्या सुमारास माताजी सुपर मार्केट आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड स्टेशन येथे घडली असून मंगळवारी(दि.22) रोजी आरोपी विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वप्न्या ऊर्फे स्वप्नील माडेकर, सुरज ऊर्फ सस्या वाघमारे, राजा माडेकर, साहिल मेहंदळ( चौघेही राहणार आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड स्टेशन) या आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती हे त्यांच्या दुकानात असताना चारही आरापी हे त्यांच्या हातात कोयते व लोखंडी रॉड घेवुन फिर्यादीच्या दुकानात घुसले आणि फिर्यादी यांना ” आम्हाला दारू प्यायला दोनशे रूपये दे ” असे म्हणुन पैसे न दिल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानाच्या काऊंटरवर कोयत्याने मारून काचेचे काऊंटर फोडुन नुकसान केले , तसेच गल्यांतील पैसे जबरदस्तीने चोरून घेतले , फिर्यादी व त्यांच्या पतीने त्यांना विरोध केला असता आरोपींनी त्यांना हत्याराचा धाक दाखवुन लाथाबुक्यांनी मारहाण केली . तसेच फिर्यादी यांच्या मदतीकरीता आलेल्या आजुबाजुच्या लोंकाना त्यांच्या हातातील हत्यारांचा धाक दाखवुन परिसरात हैदोस घातला आणि दशहत निर्माण करून लोकांना पळवून लावले. यातील सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Share this: