बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिखलीतील घरकुल येथे 40 दिव्यांगांना धान्य किट वाटप ;झुंज दिव्यांग संस्थेचे नियोजन

चिखली (वास्तव संघर्ष) : कोरोनानंतर अत्यंत हालाखित गुजराण करणाऱ्या दिव्यांगांच्या कुटुंबांना हातभार लाभावा म्हणून व्येकेंज साहेब यांच्यातर्फे चिखलीतील घरकुल येथे 40 दिव्यांगांना शनिवार (दि.19) रोजी धान्य किट वाटप करत दिव्यरत्नांची सेवा केली.

नैसर्गिक आपत्तीनंतर दिव्यांग, वृध्द, निराधारांची उपासमार होवू नये, त्यांना दोन वेळचं जेवण मिळालेच पाहिजे या उद्देशाने व्येकेंज साहेब यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना धान्य वाटप करण्यात आले. या योजनेची गरज आणि जाणिव समाजातील दानशूरांना, समाजिक संस्था, उद्योजक आणि सरकारला व्हावी या उद्देशाने शंभर दिव्यांगांना धान्य वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.कार्यक्रमाचे नियोजन झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे यांनी केले होते.

Share this: