बातम्यामहाराष्ट्र

कुलगुरूंच्या बालहट्टापायी विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला

पुणे (वास्तव संघर्ष) : कोरोना महामारीचे सावट पुन्हा एकदा दिसू लागल्याने छत्तीसगड सरकारने विद्यार्थी हितासाठी उन्हाळी परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाराष्ट्रात याच्या उलट परिस्थिती दिसत आहे.राज्य सरकार परिक्षेचे सर्व अधिकार कुलगुरूंना दिले असे म्हणते तर कुलगुरूं राज्य सरकारकडे चेंडू आहे असे विद्यार्थ्यांना सांगते या टोलवाटोलवीने मात्र विद्यार्थीचे भविष्य अंधारात आहे.

केवळ आणि केवळ काही कुलगुरूंच्या बालहट्टापायी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत आहे. असा आरोप राज्य सरकार वर होताना दिसत आहे. त्यामुळे सरकार विरोधात विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात विद्यार्थी लाखो निवेदन देऊन आणि आंदोलन करून ऑनलाईन परिक्षा घ्या असे म्हणत आहेत.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया बॅनरखाली शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये धडक दिली.ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी एसपीपीयूच्या मुख्य इमारतीवर आंदोलन केले. त्यानंतर एसपीपीयू प्रशासनाने विद्यार्थ्यांना ही मागणी राज्य सरकारकडे मांडण्याचे आश्वासन देणारे पत्र दिले.

नागपूर विद्यापीठ वगळता राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक झाली तेव्हा कोणत्याही विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी पुढे केली नाही. त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले. जर चालू सत्रातील 70 टक्क्यांहून अधिक अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला गेला असेल, तर परीक्षाही ऑनलाइन घेण्यात याव्यात, असे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी मागणी करत आहेत.छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेईल का? याकडे महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Share this: