रस्त्यावरील लोकांना अश्लील हावभाव करून वेश्यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल
देहूरोड (वास्तव संघर्ष): देहूरोड- कात्रज बायपास रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून वेश्यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई विकासनगर देहूरोड येथे सोमवारी ( दि . 21 ) दुपारी करण्यात आली .
महिला पोलीस कर्मचारी वैशाली आशिवाल यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी सात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास देहूरोड- कात्रज बायपास मार्गावर विकासनगर , देहूरोड येथील द्वारका लॉजच्या समोर सात महिला उभ्या होत्या . त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातावरे करून थांबवत होत्या . तसेच अंगविक्षेप करून त्यांच्याशी लगट करून असभ्य वर्तन करीत होत्या . तसेच छेड काढून शब्दाने बोलून त्यांना वेश्यागमनासाठी उत्तेजित करीत होत्या . त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत .