क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तरूणाच्या डोक्यात कोयता घालून खून करण्याचा प्रयत्न;पाच आरोपींना पिंपरी पोलीसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : सिगारेट आणली नाही म्हणून तरूणाच्या डोक्यात कोयता घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी(दि.22) रात्री साडेआठच्या सुमारास इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडली आहे.

सतिश ऊर्फ रोहित देविदास शिंगाडे (वय-22 रा . इंदिरानगर झोपडपट्टी डबल ट्री हॉटेलच्या मागे चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार उमेश संभाजी पवार, अमोल संभाजी पावर, गोपल्या दांडे, बाळ्या ऊर्फ कृष्णा शिवाजी वारभवन, व्यंकटेश म्हेत्रे( सर्व रा . इंदिरानगर चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास इंदिरानगर झोपडपट्टी येथे फिर्यादी सतिश हे त्यांचा मित्र आक्रम खान ( भंगारवाला ) याचा वाढदिवस करुन व टपरीवरुन बडीशेप घेवुन घरी चालला असताना यातील आरोपी उमेश पवार, अमोल पावर, गोपल्या दांडे, बाळ्या ऊर्फ कृष्णा , व्यंकटेश म्हेत्रे हे आरोपी रस्त्याच्या कडेला घोळका करुन थांबलेले होते . त्यावेळी त्यांच्यापैकी आरोपी अमोल पावर याने फिर्यादी सतीश यांना शेजारच्या टपरीवरुन सिगारेट घेवुन येण्यास सांगितली . त्यावर फिर्यादी सतीशने त्यास” मी आता घरी चाललो आहे तु दुस – या कोणाला तरी सांग” असे सांगितल्याचा राग येवुन आरोपी अमोल पावर याने फिर्यादीला शिवीगाळ करुन फिर्यादीचे गालावर चापट मारली त्याचा जाब विचारला म्हणून सर्व आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवुन शिवीगाळ करुन त्यांचे हातातील कोयते , चाकु व दगडाने फिर्यादी सतीश यांच्या डोक्यात पोटावर व अंगावर ठिकठिकाणी मारुन जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला .अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: