या कारणासाठी तो झाला किन्नर ; मात्र पोलीसांनी केली त्याला अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड मधील फरार आरोपीला पोलीसांनी अटक केली असून त्याने एका तरूणाचा खून केला आहे. ही घटना 24 ऑगस्ट 2023 रोजी एम.आय. डी. सी. खेड परिसरातील जंगलात घडली होती.
सचिन हरिराम यादव (वय-19 रा. पुणे- नाशिक रोड कुरुळी ता.खेड जि.पुणे) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
गोरख जनार्धन फल्ले(वय-32 रा .कानडी रोड, केज, बिड) रोहित शिवाजी नागवसे, (वय-22, राजबळबंद, ता केज, जि बिड) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,म्हाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातुन सचिन यादव 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता घरातून कामानिमित्त गेला व परत आला नाही. सर्वत्र शोध घेवूनही तो मिळुन न आल्याने वडील हरिराम यादव यांनी
28 ऑगस्ट रोजी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. एक तरुण मुलगा घरात कोणास काही एक न सांगता अचानक गायब झाल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास करणेकामी गुन्हे शाखा युनिट 1 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना आदेश दिले.
मृतक सचिनच्या चाळीत आरोपी रोहित भाडेकरू म्हणून रहात होता.
दरम्यान आरोपी रोहित व आरोपी गोरख दोघेही कर्जबाजारी झाल्याने पैशांसाठी यादव कुटुंबियास लुटण्याचा त्यांनी कट केला.सचिन याला निमगाव परीसरात देवदर्शनासाठी जायचे आहे असे सांगून त्या परीसरातील जंगलात सचिन याला आरोपी रोहित व आरोपी गोरख यांनी दारू पाजुन त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन त्याचा खुन केला. आरोपी गोरख याने रोहित नागवसे यास किन्नर/तृतीयपंथी बनण्यासाठी एका किन्नरकडे पाठवल्याचे सांगीतले. रोहित नागवसे हा वसई विरार परिसरात असल्याची माहिती प्राप्त केली. एका घरात किन्नर कड़े चौकशी केली असता तिने तिचे नाव गायत्री असे सांगीतले. सदरबाबत संशय आल्याने अधिक सखोल चौकशी केली असता सदर किन्नर हि पाहिजे संशयित इसम रोहित नागवसे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांना गुंगारा देण्यासाठी व स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी रोहित नागवसे हा गुन्हा घडल्यापासुन मुंबई /ठाणे परिसरात किन्नरच्या वेशात राहुन पोलीसांची दिशाभुल करीत होता. आरोपी रोहितला मुंबईमधून आणि आरोपी गोरख ला बीडमधून पोलीसांनी अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउपनि इम्रान शेख, स. पो.फौ. शिवाजी कानडे, पो. हवा. फारुक मुल्ला, पो. हवा, प्रमोद हिरळकर, पो. हवा, अमित खानविलकर, पो.हवा. सचिन मोरे. पो. हवा. उमाकांत सरवदे, पो. हवा. बाळु कोकाटे, पो.हवा. महादेव जावळे, पो.हवा, सोमनाथ बो-हाडे, पो. हवा. मनोज कमले, पो.शि. विशाल भोईर, पो. शि. प्रमोद गर्जे, पो.शि. स्वप्निल महाले, पो.शि. अजित रुपनवर, पो.शि. मारोती जायभाये, पो.शि. तानाजी पानसरे, पो.हवा. नागेश माळी (टी.ए.डब्ल्यु. पो. शि. नितेश बिच्चैवार (सायबर क्राईम) यांनी केली आहे..